अमृत पर्यटनविषयी
महाराष्ट्र शासनाचे पर्यटन पोर्टल
आमचे ध्येय
अमृत पर्यटन हे महाराष्ट्र शासनाचा शासकीय उपक्रम आहे जो अमृत( महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) अंतर्गत चालविला जातो. आमचे ध्येय हेच आहे की,
- महाराष्ट्रातील समृद्ध पर्यटन स्थळांचे आणि सांस्कृतिक वारशांचे दर्शन घडवणे
- मोफत आणि प्रमाणित नोंदीद्वारे स्थानिक व्यापारी आणि लघु उद्योग यांना पाठबळ देणे
- पर्यटन आकर्षणे आणि सेवा यांविषयी पर्यटकांना खात्रीशीर आणि विश्वासार्ह माहिती देणे
- आपातकालीन सेवा आणि सुरक्षित माहिती देण्यासाठी २४/७ उपलब्ध
- पर्यटन प्रोत्साहनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेस चालना देणे
प्रमुख वैशिष्ठ्ये
विश्वासार्हता आणि गुणवत्तेसाठी सर्व आकर्षणे व व्यापारांची माहिती आमच्या टीमकडून प्रमाणित केली जातात
स्थानिक लघु उद्योग आणि व्यापारी यांच्या वाढीस मदत मिळावी म्हणून मोफत नोंदणी
पर्यटकांसाठी २४/७ आपातकालीन सेवा आणि सुरक्षितता सूचना
अमृत उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाचे शासकीय पाठबळ
सुलभतेसाठी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत संपूर्ण साहाय्य
महाराष्ट्राची समृद्ध स्थळे आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन
अमृत उपक्रमाविषयी
अमृत( महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) हा महाराष्ट्र शासनाचा युवा विकास, संशोधन व कौशल्य प्रशिक्षणावर केंद्रित असलेला महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची तसेच स्थानिक उद्योजकांना बळकटी देण्याची मोठी क्षमता ओळखून अमृतने या पर्यटन विषयक पोर्टलची सुरुवात केली आहे.
पर्यटन प्रोत्साहन, स्थानिक व्यवसायांना पाठबळ आणि आपत्कालीन सेवा यांचा समन्वय साधून अमृत पर्यटन एक सर्वसमावेशक परिसंस्था उभारते, ज्याचा लाभ प्रवासी, स्थानिक व्यावसायिक आणि संपूर्ण महाराष्ट्रातील समुदायांना होतो.
आकड्यांमधून
३६
जिल्हे
१०००++
आकर्षणे
५००++
व्यापार
२४/७
आपातकालीन साहाय्य
संपर्क करा
ई-मेल: support@amrutparyatan.gov.in
साहाय्यता क्रमांक: +९१-८८८८-८८८-८८८ (२४/७)
पत्ता: अमृत कार्यालय, पुणे, महाराष्ट्र, भारत
